जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा.

जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा, रानमळा. केंद्र :- ढवळपुरी, ता.-पारनेर. आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Wednesday, April 29, 2020

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा शाळेतील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा शाळेतील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

       नुकत्याच जाहीर झालेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी सौरभ किशोर चौधरी याने २५२ गुण मिळवून केंद्रात चौथा क्रमांक पटकावला. तर शाळेतील विद्यार्थिनी भक्ति बाबासाहेब चौधरी या विद्यार्थिनीने २४८ गुण मिळवून केंद्रात  सहावा क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला. तनुष्का बाळासाहेब चौधरी  या विद्यार्थिनीला २२४ गुण मिळाले.
        सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री. सतीश नरसाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहोकले सर, ढवळपुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मन्यार साहेब व भाळवणी बीटच्या विस्तार अधिकारी सन्माननीय कार्ले मॅडम यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा शाळेतील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा शाळेतील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत        नुकत्याच जाहीर झालेल्य...