जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा.

जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा, रानमळा. केंद्र :- ढवळपुरी, ता.-पारनेर. आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Sunday, September 16, 2018

जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून रंगभरण स्पर्धेचे आयोजन


जागतिक साक्षरता दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा,रानमळा येथे रंगभरण स्पर्धेचे आयोजन
                        दिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी जि.प. प्राथमिक शाळा, रानमळा येथे जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला. परीपाठानंतर शाळेचे उपाध्यापक श्री. नरसाळे सर यांनी विद्यार्थ्यांना जागतिक साक्षरता दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
                        सन १९६५ साली जागतिक संघटना UNESCO ने केलेल्या सर्वेक्षणा नुसार जगातील ८५ % देशामध्ये साक्षरते विषयी लोक जागरूक नाही. त्यामुळे सन १९६६ मधील सप्टेंबर मधील ८ तारखेपासून त्यांनी साक्षरते विषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक साक्षरता दिन साजरा केला. तेव्हापासून जागतिक साक्षरता दिन ८ सप्टेंबर रोजी आपण दर वर्षी साजरा करतो.
                        त्यानंतर साक्षरते विषयी जनजागृती करण्यासाठी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी साक्षरतेविषयी अनेक घोषणा दिल्या. यामध्ये “साक्षर जनता, भूषण भारता.” यासारख्या अनेक घोषणांचा समावेश होता.
                        शेवटी विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा सुरु करण्यात आली. शिक्षक श्री. नरसाळे सर यांनी रंगभरण स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना चित्र वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने त्यामध्ये रंग भरले. इयत्ता १ ली व २ री चा एक गट व इयत्ता ३ री व ४ थी चा एक गट करून स्पर्धा पूर्ण केली. यामध्ये २ री  च्या ज्ञानेश्वरी दत्तात्रय चौधरी व ४ थी च्या श्रेया विजय फलके या विद्यार्थीनीनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.



शिक्षक दिनाचे आयोजन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
                        ५ सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. जि.प.प्राथमिक शाळा, रानमळा या ठिकाणी ५ सप्टेंबर २०१८ या दिवशी शाळेला सुट्टी असल्यामुळे दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजी शिक्षक दिन साजरा केला. या वेळी शाळेचे उपाध्यापक श्री. नरसाळे सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाविषयी सविस्तर माहिती सांगितली.
                        ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. शिक्षकांच्या भूमिकेच महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरूकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो. श्री. नरसाळे सर यांनी सांगितले कि, शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. त्यामुळे आपणही आपल्या गुरु, शिक्षकांविषयी या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपले सर्वात पहिले गुरु म्हणजे आपली आई., त्यानंतर आपले वडिल व आपल्याला ज्ञान दिलेले आपले शिक्षक यांचे आपण या दिवशी आभार मानले पाहिजे.


Wednesday, September 5, 2018

व्याख्यान आयोजन


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा येथे व्याख्यानाचे आयोजन
                        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा येथे दिनांक १/९/२०१८ रोजी WOTR संस्थेच्या सहकार्याने मातीचे संवर्धन व पाणी बचतीचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी WOTR संस्थेचे श्री. शेळके साहेब , श्री.विजय फलके तसेच त्यांच्या टिम मधील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी शाळेचे उपाध्यापक श्री. नरसाळे सर यांनी सर्वप्रथम आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. शेळके साहेब यांनी विद्यार्थ्यांना मातीचे संवर्धन कशा प्रकारे केले पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पाण्याचे आपल्या जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. पाण्याशिवाय आपली सजीव सृष्टी जगू शकत नाही. त्यामुळे पाण्याचा आपण काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याचा अपव्यय थांबवला पाहिजे.
                        त्यानंतर शाळेने सामाजिक बांधिलकी म्हणून गावातून प्रभात फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांच्या घोषणांनी गावातील परिसर दुमदुमून निघाला होता. यावेळी  “जल है तो कल है” ; “ पाणी अडवा, पाणी जिरवा” यासारख्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर WOTR संस्थेमार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहोकले सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.


Tuesday, September 4, 2018

हस्ताक्षर स्पर्धा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा येथे हस्ताक्षर स्पर्धा संपन्न
                        दिनांक २५/८/२०१८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा येथे हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढवळपुरी केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख श्री. पटेल साहेब उपस्थित होते. शाळेचे उपाध्यापक श्री. नरसाळे सर यांनी विद्यार्थ्यांना हस्ताक्षर स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळा उतारा विद्यार्थ्यांना  समजावून सांगण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहोकले सर यांनी योग्य रीतीने विद्यार्थ्यांकडून उता-याचे लेखन करून घेतले.
                        या स्पर्धेत इयत्तानिहाय खालील विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला.
अ.नं.
विद्यार्थ्याचे नाव
इयत्ता
भक्ती बाबासाहेब चौधरी
२ री
समीक्षा मच्छिंद्र भोंडवे
३ री
तेजस बाबासाहेब चौधरी
४ थी
                       
                          सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा शाळेतील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा शाळेतील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत        नुकत्याच जाहीर झालेल्य...