जि. प.प्राथमिक शाळा, रानमळा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात
साजरा
प्रभातफेरी :- १५ ऑगस्ट २०१८ रोजी
सकाळी स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाने व देशभक्तीच्या चैतन्याने उगवलेल्या
मंगलप्रभाती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. या वेळी
विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या, पर्यावरणाच्या, स्वच्छतेच्या, लेक वाचवा
संदर्भातील घोषणा दिल्या.
v ध्वजारोहण :- सिध्देश भोंडवे या विद्यार्थ्याने माजी सैनिक श्री. निवृत्ती चौधरी यांना
ध्वजारोहण करण्यासाठी विनंती केली. त्याप्रमाणे त्यांनी ध्वजारोहण केले.
v
राष्ट्रगीत
v
राष्ट्रध्वजाला
सलामी
v ध्वजगीत :- शाळेतील सर्व मुलांनी एकत्रित ध्वजगीत गायन केले.
v घोषणा :-
इयत्ता ४ थी मधील विद्यार्थी दुद्धेश्वर चौधरी याने आपल्या पहाडी आवाजात भारतीय
स्वातंत्र्यदिनाबद्दल घोषणा दिल्या. त्यापाठोपाठ इतर मुलांनीही घोषणा दिल्या.
v मान्यवरांचे स्वागत :- आलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेतील शिक्षक श्री. नरसाळे
सर यांनी शब्दरूपी स्वागत केले.
v अध्यक्ष स्थान :- स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान
स्वीकारण्याची विनंती जेष्ठ मार्गदर्शक श्री. नानाभाऊ फलके यांना करण्यात आली.
v अनुमोदन :- या अध्यक्षीय सूचनेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहोकले सर यांनी अनुमोदन दिले.
v सामुदायिक कवायत :- विद्यार्थ्यांनी यावेळी सामुदायिक कवायत केली. यावेळी
ड्रम वाजवण्याचे काम श्री. नरसाळे सर यांनी केले.
v प्रास्ताविक :- आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रोहोकले सर
यांनी केले. रोहोकले सर यांनी यावेळी शाळेच्या प्रगतीविषयी थोडक्यात माहिती दिली.
त्याचप्रमाणे शाळेसमोर असणा-या विविध समस्यांविषयी गावातील ग्रामस्थांना माहिती
दिली. त्याचप्रमाणे शाळा डिजिटल करण्यासाठी लोकांना आवाहन केले.
v श्रद्धांजली :- १५ ऑगस्ट या दिवशी आपण आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो. त्याचप्रमणे
आपले संरक्षण करण्यासाठी सतत सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांचेही आभार मानणे आपले
आद्य कर्तव्य आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी
स्वतःच्या जीवाची आहुती दिली. त्यामुळे
रानमळा शाळा व ग्रामस्थ यांचे वतीने शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना २ मिनिट मौन
पाळून आदरांजली वाहण्यात आली.
v विद्यार्थी भाषणे :- यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले
विचार भाषणामधून प्रकट केले.यावेळी खालील विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
१ ) अथर्व विजय फलके – इयत्ता १ ली
२ ) संग्राम देविदास फलके
– इयत्ता १ ली
३ ) भक्ती बाबासाहेब चौधरी – इयत्ता २ री
४ ) तनुश्का बाळासाहेब चौधरी – इयत्ता २ री
५ ) सौरभ किशोर चौधरी – इयत्ता २ री
६ ) प्राची सहादू भोंडवे– इयत्ता ३ री
७ ) समिक्षा मच्छिंद्र भोंडवे – इयत्ता ३ री
८ ) भाग्यश्री संजय
भोंडवे – इयत्ता ३ री
९ ) धिरज पोपट चौधरी – इयत्ता ४ थी
१० ) तेजस बाबासाहेब चौधरी – इयत्ता ४ थी
११ ) आकांक्षा उमेश चौधरी – इयत्ता ४ थी
१२ ) दुद्धेश्वर रघुनाथ चौधरी – इयत्ता ४ थी
१३ ) सिद्धेश गोरक्ष भोंडवे – इयत्ता ४ थी
१४ ) श्रावणी किशोर चौधरी – इयत्ता ४ थी
१५ ) श्रेया विजय फलके – इयत्ता ४ थी
यामध्ये
श्रेया फलके या विद्यार्थीनीने “ लेक वाचवा, देश वाचवा ’’ या विषयावर भाषण करून
सर्वाना मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी प्रोत्साहित केले.
v मान्यवरांची भाषणे :- गावातील माजी शिक्षक श्री. दत्तात्रय चौधरी यांनी आपले
मनोगत व्यक्त केले. यामध्ये सर्वप्रथम त्यांनी सर्व चिमुकल्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांकडून
त्यांनी विविध प्रकारच्या नविन घोषणा म्हणून घेतल्या. मुलांनीही उत्साहात या घोषणा
दिल्या.
यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. देविदास फलके यांनी
आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी मुख्याध्यापक श्री. रोहोकले सर यांनी
मांडलेल्या डिजिटल शाळेच्या संकल्पनेविषयी आपले मत प्रकट केले. त्याचप्रमाणे
गावातील सर्व लोकांना या कामासाठी निधी देण्याचे आवाहन केले.
v सांस्कृतिक कार्यक्रम :- यानंतर शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या सर्व
विद्यार्थ्यांनी आपल्या कडील विविध प्रकारच्या कला मान्य वरांच्या समोर सादर
केल्या.
v
कोलगेट
व ब्रश वाटप :- ग्रामपंचायत
ढवळपुरी यांचेकडून शाळेतील सर्व मुलांसाठी स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागाव्यात
यासाठी कोलगेट व ब्रश चे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे आरोग्य विषयक माहिती
पत्रक पुरवण्यात आले. याचे वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात
आले.
v
अध्यक्षीय
भाषण :- शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ फलके
यांनी आपले विचार प्रकट केले.
v
खाऊ वाटप :- गावातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना खाऊसाठी देणगी दिली.
त्यातून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
v
आभार
प्रकटन :- शाळेचे मुख्याध्यापक
श्री. रोहोकले सर यांनी आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचे आभार मानले.
त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त खाऊ साठी देणगी
उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व देणगीदारांचे आभार मानले. तसेच शाळेतील
विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे आर. ओ. चे पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत अॅक्वा
चे प्रोप्रा. शिवाजी चौधरी व दिलीप चौधरी यांचे आभार मानले. व अध्यक्षांच्या
परवानगीने कार्यक्रम संपला असे घोषित केले.
v
सूत्रसंचालन :- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतीश नरसाळे सर यांनी
केले.
No comments:
Post a Comment